Share

जाणून घ्या पुणे विभागात कोरोनाची नेमकी काय आहे स्थिती

Published On: 

पुणे दि.5:-  पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 128 झाली असून ती जिल्हानिहाय पुणे-98, सातारा-3 सांगली-25 आणि कोल्हापूर-2 याप्रमाणे आहे. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 2 हजार 450 होते. त्यापैकी 2 हजार 298 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 152 चे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

प्राप्त अहवालांपैकी 2 हजार 146 नमुने निगेटीव्ह आहेत व 128 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 22 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. आजपर्यंत 17 लाख 5 हजार 931 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 78 लाख 70 हजार 783 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 579 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज एकुण 24 ने वाढ

पुणे जिल्हयातील कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज एकुण 24 ने वाढ झाली असून पुणे जिल्ह्यामधील कोरोना सांसर्गिक रुग्ण संख्या एकुण 98 झाली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दाखल झालेली रुग्णसंख्या रुग्णालयामध्ये 78 असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील रुग्णालयामध्ये एकुण 20 रुग्ण दाखल झाले आहेत.

पुणे जिल्ह्यामधून तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1 हजार 758 होते. त्यापैकी 1 हजार 635 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 123 चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 552 नमुने निगेटीव्ह आहेत व 98 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 22 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरीत 71 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

विभागामध्ये सद्यस्थितीत एकुण 88 ठिकाणी कॉरंटाईन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकुण 12 हजार 850 बेड्स उपलब्ध आहेत. तसेच 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकुण 2 हजार 167 बेडस उपलब्ध आहेत.

चप्रमाणे विभागामध्ये शासकीय व स्थानीक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडे सदयस्थीतीत एकुण N95 मास्क 52 हजार 240, ट्रीपल लेअर मास्क 2 लाख 47 हजार 219 एवढे उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार 416 पीपीई कीट, 12 हजार 252 हॅण्ड सॅनिटायझर (500 मिली ), 4 हजार 454 व्हीटीएम कीट व शासकीय रुग्णालयात 137 व्हेंन्टीलेटर्स उपलब्ध आहेत व खाजगी रुग्णालयात 1 हजार 328 व्हेंन्टीलेटर उपलब्ध आहेत.

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 30 हजार 464.19 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागात अंत्योदय (AAY) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजना अंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिका /कुटुंबापैकी दि. 5 एप्रिलपर्यंत 12 लाख 46 हजार 650 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदळचे 30 लाख 1 हजार 393.34 क्विंटल वितरण करण्यात आले आहे.

मार्केटमध्ये विभागात भाजीपाल्याची आवक 15 हजार 605 क्विंटल, फळांची 2 हजार 90 क्विंटल तसेच कांदा/ बटाट्याची 2 हजार 419 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात दि.4 एप्रिल रोजी 98 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.69 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.

विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 114 व साखर कारखान्यामार्फत 571 असे एकुण 685 रीलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण 6 लाख 4 हजार 32 स्थलांतरीत मजूर असून एकुण 1 लाख 18 हजार 312 मजूरांना भोजन देण्यात येत आहे, असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!