Share

रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला झपाट्याने

Published On: 

पालघर : जगभरात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 65 हजारावर गेली आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. पालघर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे.आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 15 कोरोना आढळून आले आहेत . यात काल 4 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातले 3 जण हे वसई ग्रामीण भागातल्या राजोडी इथले तर 1 जण नालासोपाऱ्यातला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू चा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता पर्यंत पंधरा ठिकाणी कोरोना विषाणू संशयित रुग्णांना विलग करून ठेवण्याची सोय केली आहे. या पंधरा ठिकाणी आता पर्यंत १ हजार ११९ ऊसतोड मजुरासह इतर बाहेर गावाहून आलेल्या व्यक्ती आहेत. या सर्वांना भोजन चहा-नाश्ता याची सोय केली असल्याच निवासी उपजिल्हाधिकारी आहेर यांनी सांगितल.

दरम्यान,उस्मानाबाद जिल्ह्यात काल कोरोनाबाधीत आणखी एक रुग्ण आढळला आहे. उमरगा शहरातील हा रुग्ण असून त्याचा तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या तीन झाली आहे. त्याच्यावर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली आहे.

रत्नागिरीत राजिवडा इथं आढळलेल्या करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९ जणांना जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये एकूण ३२ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या चौघांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामध्ये जिल्हा कारागृहातल्या एकाचा समावेश आहे. नव्या पॉझिटिव्ह रुग्णासह एकूण २० जण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!