🕒 1 min read
औरंगाबाद : इंग्लंडमधून औरंगाबादेत आलेल्या एका कुटुंबातील चार जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये कुटुंबातील तरुणी पॉझिटिव्ह आढळून आल्याने सदर मुलीवर मुंबईत उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर आई-वडील, बहीण असे तिघे औरंगाबादेत आले. या तिघांच्या तपासणीनंतर ५० वर्षीय वडील औरंगाबाद पॉझिटिव्ह आढळून आले. तर आई आणि बहीण दोघे निगेटिव्ह आढळून आल्या. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीचे स्वॅब पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
औरंगाबादमधील एका नागरिकाला मुंबईत गेल्यावर ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे रविवारी समोर आले. त्यानंतर मूळ औरंगाबादचे असलेल्या एका कुटुंबातील तरुणीला इंग्लंडहून येताना मुंबईत तपासणी केली असता ओमिक्रॉन झाल्याचे आढळून आले. १४ डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर हे कुटुंब उतरले होते. तेथे त्यांनी औरंगाबादचा पत्ता दिला. तपासणीअंती तरुणी कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले तर इतर तिघे निगेटिव्ह आले.
बाधित मुलीचे वडील सात दिवस मुंबईतच क्वारंटाइन झाले तर आई आणि बहीण औरंगाबादेत येऊन एका हॉटेलमध्ये थांबले. बाधित युवतीचा आणि तिच्या कुटुंबियांचा औरंगाबादेतील कुणाशीही संपर्क आलेला नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन मनापाच्या आरोग्य विभागाने केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या वडिलांना महापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “कुंपणच शेत खात असेल तर…” पेपरफुटीवरुन दरेकरांचा घणाघात
- सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘KGF Chapter 2’ अव्वल स्थानी
- वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया
- “ज्वलंत हिंदुत्व UPA च्या दावणीला…” भाजपाची शिवसेनेवर खोचक टीका
- “बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं…” ; सदाभाऊ खोतांनी घेतली फिरकी


