Share

आणखी एका मालिकेच्या सेटवर सापडला कोरोना रुग्ण

Published On: 

मुंबई : सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत शूटिंगला सुरुवात झाली आहे. शूटिंगला सुरुवात झाली असली तरी सेटवर कोरोनाचा धोका कायम आहे. दरम्यान ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेच्या सेटवर कोरोना रुग्ण सापडला आहे.

लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे. अभिनेत्री सौम्या टंडनच्या हेअर ड्रेसरला कोरोनाची लागण झाली आहे. आता हेयर ड्रेसर्सच्या संपर्कात आलेल्या कलाकारांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सरकारने परवानगी देताच ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेच्या नव्या भागांचं चित्रीकरण सुरु झालं होतं. आता हेअर ड्रेसर कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यामुळे सेटवर काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ या मालिकेच्या सेटवरील एका कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर ताबडतोब मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

मराठवाड्यात कोरोनाचे थैमान, झपाट्याने वाढतेय रुग्णांची संख्या

#Corona : पुण्यातील ६ नगरसेवकांना कोरोनाची लागण, तर खासदार, आमदार झाले क्वारंटाईन

चिंताजनक : रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानावर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!