पुणे : सद्या जगभर कोरोना महामारीची साथ असून भारताने एकूण साडे सहा लाखांहून जास्त रुग्णांचा टप्पा पार केला आहे तर राज्यात हा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. राज्यात अनेक शहर हे कोरोनाची हॉटस्पॉट बनलं आहे, त्यामधील पुणे हे एक आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे, त्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते यांच्यासह ६ नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
पुण्यातील दोन खासदार आणि ४ आमदार यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे तर आतापर्यंत महापालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेच्या वर्तुळात भीतीचं सावट निर्माण झालं. ‘लोकमत’ने या बाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबात स्वतः महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. मोहोळ यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली, यात त्यांच्या कुटुंबातील ८ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
याआधी राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती, या नेत्यांनी कोरोनावर यशस्वी मात करत पुन्हा सार्वजनिक जीवनात परतले आहेत. तर अलीकडेच अपक्ष आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे.
धोका वाढला : कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना ‘कोरोना’ची लागण
धक्कादायक : पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण
#corona : पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसात 24जण कोरोनाबाधित, महापालिका क्षेत्रात चिंता वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

