Share

#corona : राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Published On: 

मुंबई : गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येत नसल्याने पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय वापरला जात आहे. तर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, आता कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे.

यापूर्वी राजभवनमधील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर 100 कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील ५५ कर्मचाऱ्यांचे अहवाल शनिवारी सायंकाळी आले. त्यात 1६ जण पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारी दुपारी आणखी एक अहवाल आला असून, त्यात अन्य 8 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे.

आता सर्व कर्मचा-यांच्या कुटुंबीयांचीसुद्धा कोरोना चाचणी होईल. आता महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. राजभवन येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. राजभवन येथील कर्मचारी निवासस्थानी अलगीकरण सोयीस्कर असल्यास त्यांना तेथेच त्यांच्या व्यवस्थेनुसार अलगीकरण करण्यात येणार आहे. राजभवन येथील प्रशासनाने जर महानगरपालिकेकडे अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या, तर तेथील कर्मचाऱ्यांचे अलगीकरण महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या केंद्रांमध्ये त्वरित केले जाणार आहे.

महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाकडून राजभवन येथे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही वेळोवेळी केली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत. राजभवन येथे डॉक्टर्स व तत्सम कर्मचारी आहेत. तथापि आवश्यक वाटल्यास महापालिकेचे डॉक्टर्स व इतर कर्मचारी ही मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली नाही.

औरंगाबादमध्ये कोरोनाचे थैमान सुरुचं, आजही 24 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

२४ तासांत आणखी ७७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत एकूण ६० पोलिसांचा मृत्यू

‘या’ देशात कोरोनाची लस अंतिम टप्प्यात , 20 कोटी व्हॅक्सिनचे उत्पादन करण्याची तयारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!