औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज औरंगाबादेत आणखी 24 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
औरंगाबादमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीलाच 24 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा 651 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे.
दरम्यान औरंगाबादेत सोमवारी 69 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यातील 18 जण हे 17 वर्षावरील कमी वयोगटाची आहेत. यात जवळपास 8 मुले आणि 9 मुलींचा समावेश आहे. तर 5 मुले ही 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. औरंगाबादेत सोमवारी 69, तर रविवारी 50 नवे रुग्ण आढळले होते.
औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांचा आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या 20 दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
काहीजण मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत : जितेंद्र आव्हाड
मोठी बातमी : पंतप्रधान मोदी आज 8 वाजता जनतेशी साधणार संवाद, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

