🕒 1 min read
बीजिंग : जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे लसीचे उत्पादनही काही देशांमध्ये सुरू होत आहे. भारतातही कोरोना लसीच्या ह्युमन ट्रायलला सुरुवात झाली आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी रशिया, ब्राझील, चिली आणि सौदी अरेबियाशी चर्चा करीत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना संसर्ग खूप कमी झाला आहे. मात्र लसीच्या चाचण्यांसाठी अशा भागातील स्वयंसेवकांवर ट्रायल करावे लागते, जेथे कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे चीनने परदेशात लसीची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या अमेरिकेनंतर ब्राझीलमधील कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. अशा परिस्थितीत ब्राझील कोरोना लसच्या चाचणीसाठी योग्य ठिकाण ठरू शकते. CanSino Biologics चे सह-संस्थापक किउ डोंग्झू यांनी परदेशात चाचणीच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे. डोंग्झू म्हणाले की, फेज-3 चे ट्रायल लवकरच सुरू होईल. यावेळी 40 हजार लोकांना लस डोस देण्याची तयारी सुरू आहे.
CanSino Biologicsने Ad5-nCov नावाची कोरोना लस विकसित केली आहे. Ad5-nCov ही पहिली लस आहे ज्याची चाचणी चीनमधील रुग्णांवर करण्यात आली. कंपनीचे म्हणणे आहे की Ad5-nCov लसच्या दुसर्‍या टप्प्याच्या चाचणी दरम्यान, 508 लोकांना लस देण्यात आली, ज्याचे परिणाम चांगले दिसून आले. CanSino Biologicsने असेही म्हटले आहे की कंपनी चीनमध्ये एक नवीन फॅक्टरी बनवित आहे. 2021 च्या सुरूवातीस, या लसीचे उत्पादन येथे सुरू होईल. एका वर्षात या कारखान्यातून 10 ते 20 कोटी लस डोस तयार केले जातील.
धक्कादायक: कोरोना रुग्णाचा मृतदेह नेला रिक्षातून
दरम्यान, दरम्यान, राज्यात शनिवारी ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.
अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

