Share

उस्मानाबाद जिल्ह्यात १५ वकिलांचा कोरोनाने मृत्यू, वारसांना २५ लाखांची मदत देण्याची मागणी

Published On: 

उस्मानाबाद : कोरोना काळात जीव धोक्यात घालून न्याय निवाड्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या जिल्ह्यातील १५ वकिलांना कोरेानाने जगातून हिरावून नेले. पण मृत्यूपश्चात अनेकांच्या कुटुबीयांचे जगणे मुश्किल झाले आहे. शासनाने मृत्युपश्चात वकिलांच्या वारसांना २५ लाख रूपयांची मदत द्यावी, वकिलांनाही फ्रंट लाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळाने केली आहे.

उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील तब्बल १४ वकिलांचा कोरेानाने मृत्यू झाला आहे. प्रतिकुल परिस्थितीत काम करणाऱ्या वकिलांना कोरेानात शासनाकडून मात्र कोणतेही संरक्षण मिळत नाही. मृत्यू पश्चात कुटुंबियांची परवड होत आहे. मात्र शासनाकडून त्यांची दखल घेतली जात नाही. जिल्हा न्यायालयातील मृत्यू पावलेल्या १४ पैकी काही वकिलांच्या कुटुंबियांची कौटुंबिक परिस्थिती अतीसामान्य आहे. अशा कुटुंबीयांसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळाकडून होत आहे.

न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर पडणाऱ्या वकिलांचा कोरेानाने मृत्यू होत असताना वकिलांना शासनाने लसीकरणासाठी प्राधान्य दिलेले नाही. त्यांना विम्याचे संरक्षण नाही किंवा मृत्यूपश्चात कुटुंबीयांना आर्थिक मदत नाही. अनेक वकील बांधवांचे निधन तरूण वयात झाले. कदाचित त्यांना कोराेना प्रतिबंधक लसीकरण केले असते तर जीवदान मिळू शकले असते. त्यामुळे शासनाने आता तरी वकिलांचे प्राधान्याने लसीकरण करावे,सर्व वकिलांचा विमा उतरवावा,वकिलांना फ्रंट लाइन वर्करचा दर्जा द्यावा व मृत्युपश्चात कुटुंबीयांना २५ लाख ररुपये मदत राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!