तुळजापूर – सध्या करोना महामारीने सर्वञ हाहाकार माजवला असुन याचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसतो आहे . शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या शेतात पिकवलेली बटाटे, कोंथीबर, ककडी, द्राक्ष , विड्याची पाने, कलिंगडी खरबुज पपई यासारखी शहरात मागणी असणाऱ्या भाज्या आणि फळांना मागणी नसणे आणि विक्रीची सोय नसणे यामुळे अक्षरशः फेकून द्यावी लागत आहे.
आता पालेभाज्या आणि फळे शहरामध्ये विकण्यासाठी बंद झाल्याने फळबागा शेतकरी चिंतेत पडला असुन शेतातील फळबागा व भाजापाला याचे करायाचे काय असा प्रश्न त्यास पडला आहे. हा माल जर शहरातील बाजार पेठेत विकला गेला नाहीतर तो खराब होणार आहे.यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होणार आहे. त्या मुळे अतिशय कष्टाने पिकवलेला सोन्या सारख्या माल आता मातीमोल होताना शेतकऱ्यांना पाहावे लागणार आहे.
अवकाळी पाऊस दुष्काळ संकटातुन नुकताच बाहेर पडत असताना करोना संकट शेतकऱ्यांन समोर आ वासुन उभे आहे. जागतिक सह अन्य घडामोडीचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. द्राक्ष कोथींबर टोमॅटो ,विड्याची पाने सह अन्य फळे व शेतमाल पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च येतो.अपार मेहनत कष्ट घ्यावे लागतात.
आता हा शेतमाल विकून पैसे येणार त्यावेळेसच हे नवीन संकट शेतकऱ्यांन पुढे उभे राहिले आहे . त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. दुष्काळ तुन वाचल्यावर चार पैसे मिळतील या आशेने मोठ्या प्रामाणात अनेक फळ व भाज्या लागवड तिर्थक्षेञ तुळजापूरच्या पंचक्रोषीत असणाऱ्या काक्रंबा आपसिंगा तडवळा मोर्डा सिंदफळ काञी कामठा आदि भागात मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
द्राक्ष काढणी आणि टोमॅटो कोंथीबरचा माल काढणीस आले आहेत. परंतु करोना पार्श्वभूमीवर चाळीस रुपये किलोने ठोक विकण-या द्राक्षांना वीस रुपयाने घेण्यास हैद्राबाद सोलापूर सह अन्य व्यापारी तयार नाहीत बाजार पेठ बंद असल्याने व्यापारी वर्गाने इकडे येणेच बंद केले आहे . पानाची दुकाने आणि लग्न कार्यक्रम बंद झाल्याने विड्याची पानेही मातीमोल झाले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतमाल जनावरांना खाऊ घालणे एवढाच पर्याय शिल्लक राहिला आहे. सध्या शेतात माल तयार आहे मात्र घेण्यास कुणीही तयार नसल्याने माल शेतातच करपुन जाण्यास सुरवात झाली आहे. यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखीनच कर्जाचा खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

