टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना दिली.
महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळालं आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असंही टोपेंनी सांगितलं आहे.
मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

