टीम महाराष्ट्र देशा – देशात दिवसेंदिवस कोरोनाच संकट गहिरं होत आहे. कोरोना आता गुणाकार करण्याच्या स्थितीत असून आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे.
आज राज्यात कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरवर दिली आहे.
राज्यात आज कोरोनाच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे. कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 9, 2020
राज्यात कोरोन बाधीतांची संख्या वेगाने वाढत असल्याने सरकारने नागरिकांना गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच आता सरकारकडून अधिक कडक कारवाई केली जाणार असून लॉक डाऊनचे नियम न पाळणार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचीही मदत घेण्यात येणार आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

