टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आलं आहे परंतु रोजच्या रोज कोरोन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आजही राज्यात ७७८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. याबाबतच वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे.
राज्यात आज ७७८ नवीन रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे तसेच १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६४२७ झाली असून ८४० रुग्णांना आतापर्यंत बरे होऊन दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. ही आकडेवारी संध्याकाई ६ पर्यंतची आहे.
आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोन होत स्पोटची संख्या १४ वर ५ झाल्याची माहिती दिली आहे. तसेच केंद्रीय पथकाचा अंदाज अहवाल हा गणितीक आणि सांख्यिकीच्या आधार असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
दरम्यान राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. नागरिकांनी घरी थांबून सरकारला सहकार्य करावे असही त्यांनी म्हंटलं आहे.
778 new #COVID19 cases & 14 deaths reported in Maharashtra today, as of 6 pm. Total coronavirus cases in the state now at 6427, including 840 discharged after recovery: State Health Department pic.twitter.com/6sI4HXSmAC
— ANI (@ANI) April 23, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

