Share

करोनाचा प्रादुर्भाव आता संपला ; भाजपा नेत्याचा दावा

Published On: 

नवी दिल्ली : “काही लोकांना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखं वाटत असेल. परंत ते करोनामुळे नाही तर भाजपाच्या भीतीनं आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे, असा दावा पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी रॅली दरम्यान केला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भाजपकडून ममता सरकारवर टीका करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी या ठिकाणी आयोजित रॅलीला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे. “करोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे,” अशी घोषणा पश्चिम बंगाल बीजेपीचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केली. त्यांच्या रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात लोकं जमा झाले होते. “काही लोकांना या ठिकाणी गर्दी पाहून आजारी पडल्यासारखं वाटत असेल. परंत ते करोनामुळे नाही तर भाजपाच्या भीतीनं आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता संपला आहे. ममता बॅनर्जी विनाकारण लॉकडाउन लागू करत आहेत. भाजपानं बैठका आणि रॅलींचं आयोजन करू नये यासाठी हे केलं जात आहे,” असं घोष म्हणाले.

आम्ही ज्या कोणत्याही ठिकाणी जातो तेथील स्थिती आपणहूनच रॅलीमध्ये बदलते,” असंही त्यांनी नमूद केलं. देशात दिवसभरात ९५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले होते. अशाच वेळी घोष यांचे हं वक्तव्य समोर आल्याने त्यांच्यावर आता टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या

भारत- चीनमध्ये तणाव मिटण्याची शक्यता

सिक्सर किंग पुन्हा पंजाबकडून खेळणार

विद्यार्थ्यांना दोन दिवसांत प्रश्नपेढी मिळणार; उदय सामंत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!