Share

कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून कोरोना आता हात-पाय पसरु लागला आहे – मुख्यमंत्री

Published On: 

🕒 1 min read

अलिबाग : कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून कोरोना आता हात-पाय पसरु लागला आहे. मोठमोठ्या व्हिआयपींकडे असणारे सुरक्षा कवच भेदून तो शिरकाव करू लागला आहे. देशाचे गृहमंत्री, अन्य राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर येत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा परिस्थितीत आपण गाफील राहता कामा नये, असे आवाहन जनतेला केले आहे. केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या २०० बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

दरम्यान, गावपातळीवर कोरोना दक्षता समिती स्थापन करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे, मात्र नागरिकांनी अनावश्यक प्रवास करणे टाळून वाहतूक व रहदारी कमी करावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर ठरणार उपयुक्त – उद्धव ठाकरे

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरासदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, डॉ. फैसल देशमुख हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

‘गेले काही महिने राज्यात दर दिवसागणिक टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर उभे केले व या कोरोनाच्या साथीला समर्थपणे तोंड दिले. राज्यातील सत्तेत चांगले सहकारी मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे, म्हणूनच हे श्रेय माझे एकट्याचे नसून जीवापाड मेहनत घेणाऱ्या तुम्हा सर्वांचे आहे’. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले. तर महाड येथील एमआयडीसीमध्ये २०० बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-१९ शी एकजुटीने लढा देताना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

नागपुरात खाजगी रुग्णालयांची आकस्मिक तपासणी केली जाणार; तुकाराम मुंढे यांनी दिले आदेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!