अलिबाग : महाड येथील एमआयडीसीमध्ये २०० बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर कोविड-१९ शी एकजुटीने लढा देताना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या २०० बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. देवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिरासदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, डॉ. फैसल देशमुख हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
नागपुरात खाजगी रुग्णालयांची आकस्मिक तपासणी केली जाणार; तुकाराम मुंढे यांनी दिले आदेश
‘गेले काही महिने राज्यात दर दिवसागणिक टेस्टींग लॅब, कोविड केअर सेंटर उभे केले व या कोरोनाच्या साथीला समर्थपणे तोंड दिले. राज्यातील सत्तेत चांगले सहकारी मिळाले म्हणून हे शक्य झाले आहे, म्हणूनच हे श्रेय माझे एकट्याचे नसून जीवापाड मेहनत घेणाऱ्या तुम्हा सर्वांचे आहे’. असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.
ठाकरे सरकार देणार शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण


