सोलापुर : कोरोनाला अटकाव करण्यासाठी सध्या विविध उपाययोजना राबवण्यात येत असं असलं तरी सोलापूर शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे . शनिवारी शहरात कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळलेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५० झाली आहे. ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला आहे या कालावधीत कोरोनामुळे ४ जणांच्या मृत्यूची नोंद देखील झालीये. असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कळविले आहे.
सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. आज दिवसभरात ८२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७३ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे तर ९ लोकांना जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे.
हे नवे रुग्ण शांतीनगर मध्ये ४, कुमठा नाका १, लष्कर १, मोदी १, त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील घेरडी येथेही एक रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर घेरडी येथील एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.
शुक्रवारी सोलापूर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची ४१ संख्या होती. कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या ४६ आहे तर चौघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.
सध्या आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या ११२९असून त्यापैकी ९८७ जणांचा अहवाल प्राप्त झाला तर ९३७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. अजून १४२ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

