औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी); तसेच मिनी घाटी अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने रविवारी (२९ मार्च) एकूण सहा कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान शनिवारी करण्यात आलेल्या चारही रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार ४२ वर्षांच्या कोरोना संशयित महिलेला रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तसेच ६२ वर्षांचा पुरूष संशयित रुग्ण व २३ वर्षांच्या संशयित गर्भवती महिलेला तपासून घाटीमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे.
तत्पूर्वी घाटीमध्ये रविवारी ४३ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये तीन संशयित रुग्ण आढळून आले व त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यासह शहरात कोरोनाचे १२६ संशयित रुग्ण झाले आहे मात्र एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने धोका कमी आहे.
शहरात काही दिवसां पूर्वी एका युवकाचा सारी या साथीच्या आजाराने मृत्यू झाला होता व त्यानंतर आता पर्यंत घाटी रुग्णालयामध्ये ‘सारी’चे आठ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहे.