Share

राज्यातील नेत्यांना शाब्दिक घाण करण्याची सवयचं! पटोले, राणे, दानवे…एकाच रांगेत

Published On: 

🕒 1 min read

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल (Prime Minister Narendra Modi) अपशब्द वापरल्याने राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. “मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो” असे विधान नाना पटोले यांनी केले होते. याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते पटोलेंवर टीका करत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील राजकीय नेत्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत ज्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली.

नाना पटोले यांच्यासोबतच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, निलेश राणे, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी देखील वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करण्यात हे सर्व राजकीय नेते एकाच रांगेत आहेत. आधी बोलायचं नंतर सारवासारव करायची, ही या नेत्यांची परंपरा आहे. या राजकीय नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यातील नुकत्याच केलेल्या आणि चर्चेत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नजर टाकूया.

गुलाबराव पाटलांबद्दल अत्यंत शिवराळ भाषा

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी कव्वाली गायन केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. याच कव्वाली गायनावरून नीलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर पातळी सोडून टीका होती. राणेंनी गुलाबराव पाटलांबद्दल बोलताना अत्यंत शिवराळ भाषा वापरली होती. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत थोबाडीत मारण्याची भाषा वापरली होती. “मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस हे आठवत नाही, जर त्या ठिकाणी मी असतो तर कानाखाली खेचली असती”, असं टोकाचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं.

आदित्य ठाकरेंना बघून काढला मांजरीचा आवाज

निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंना बघून त्यांनी मांजरीचा आवाज काढला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता.

“मुख्यमंत्र्यांचे काय ? जाऊ दया, मरू दया तिकडं”

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांची एका कार्यक्रमाप्रसंगी भाषणातून महापौर श्रीकांचना यन्नम यांना उद्देशून बोलताना अचानकपणे जीभ घसरली होती. ‘माझे नेते अजित पवार आहेत. मुख्यमंत्र्यांचे काय ? जाऊ दया, मरू दया तिकडं’, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

मुख्यमंत्र्याचा एकेरी शब्दात उल्लेख

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तर वादग्रस्त वक्तव्य करण्यात अग्रेसर असतात. ‘एवढी तूर घेतली तर रडतात साले’ असे धक्कादायक विधान केल्याने तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे हे अडचणीत आले होते. आता नाना पटोले सारवासारव करत आहेत. त्याप्रमाणे दानवेंनी देखील केली होती. पण तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाहीत. त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जाव लागलं होत. एक महिन्यापूर्वी रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्याचा एकेरी शब्दात उल्लेख केला आहे. होता. रावसाहेब दानवेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून २ महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना एकेरी संबोधले होते.

ओबीसी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील काही दिसांपूर्वी आरक्षणाबाबत बोलत असताना ओबीसी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होत. ओबीसींवर माझा विश्वासच नाही. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महरा आणि दलित समाज होता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!