Share

Nana Patole | “देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपचे षडयंत्र”; नाना पटोलेंचे गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. ड्रग्जसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

“भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून, देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे हे स्पष्ट होत आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून ड्रग्जच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच ही परिस्थिती उद्धवली आहे.” अशी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, “तरुण पिढी नशेच्या आहारी जाणे आपल्या देशाच्या भविष्यासाठी चांगले नाही. अंमली पदार्थांची तस्करी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गुजरातच्या मुंद्रा या खासगी बंदरात हजारो टन ड्रग्ज आल्याचे देशाने पाहिले, अशा घटना एकदाच घडलेल्या नसून अनेकवेळा घडलेल्या आहेत. जेएनपीटी बंदरातूनही अंमली पदार्थाचा साठा असलेला कंटनेर जप्त करण्यात आला होता.

पुढे ते म्हणाले, बंगरुळुमध्येही तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. देशात वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी राजरोस होत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचेच या घटनांवरून दिसते.

सेलिब्रेटींकडे गांजा सापडला की भांडवल

पटोले म्हणाले, “मुंबईत काही सेलिब्रिटींच्या घरी दोन-चार ग्रॅम गांजा सापडला तरी त्याचे भांडवल करून मुंबई म्हणजे नशेखोर लोकांचे शहर झाल्याचे चित्र निर्माण करण्याचे काम मविआ सरकार असताना भाजपा व त्यांच्या समर्थकांनी केले होते. हजारो टन अंमली पदार्थ रोखू न शकणारे दोन चार ग्रॅम गांजावर मात्र मोठा आकांडतांडव करत होते.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!