Share

नरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ‘पीएम नरेंद्र मोदी ‘ या बायोपिकला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य -कला -सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे हा इशारा दिला .

‘हा बायोपिक म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग या चित्रपटाने होत असल्याची तक्रार आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत. तसेच हा चित्रपट प्रदर्शित करू नये असा इशाराही चित्रपट गृहांना देत आहोत .तरीही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास होणाऱ्या उद्रेकाची जबाबदारी निर्माते , वितरक , प्रशासन आणि चित्रपट गृह मालकांची राहील ‘असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे .

विवेक ओबेरॉय ची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे . हा उघड -उघड निवडणूक प्रचाराचा प्रयत्न असून त्याचा खर्च भाजपच्या प्रचारात धरणार का ? असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. निवडणूक आयोग या चित्रपट प्रदर्शनाच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसला असला तरी, आम्ही त्यांना जागे करू,असेही त्यांनी म्हटले आहे .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!