Share

बीड शहरातील १४ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

Published On: 

बीड ::- बीड शहरात विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शहरातील १४ ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे .

बीड शहरातील शिवाजी नगर, स्वराज्य नगर , रहेमतनगर ,धानोरा रोड (पाबळे क्लिनीक पासूनचा परिसर) कॅनरा बँक कॉलनी , कालीका नगर , अक्सा कॉलनी (शहेनशहा नगर) , शहेशाहनगर , अजीजपुरा (काली मस्जिद), विद्या नगर पूर्व, गजानन कॉलनी (शाहूनगर) ,आदित्य नगरी, MSEB समोरची माळवेस आणि कबाड गल्ली या भागातील संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन( Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे.

तसेच सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘कितीही संकटे येउदे जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी झोकून देणे हीच शिवसैनिकांची ओळख’

बुलेट ट्रेन होणार कि नाही? उद्धव ठाकरेंनी घेतली ‘ही’ भूमिका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!