मुंबई : परळीतील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवसेना आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचं दिसत आहे. पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात धक्कादायक आरोप केला जात आहे. संजय राठोड यांच्याविरोधात शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका महिलेने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत माझा लैंगिक छळ करतात असं ही त्यात म्हटलं आहे.
या आरोपांना आता संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे संजय राठोड यांनी सांगितले आहे. आज सकाळी संजय राठोड यांनी पत्रकार परिषेद आयोजित केले होती. यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले कि, ‘अत्यंत खालच्या थराला जाऊन सध्या राजकारण केले जात आहे. मी आणि माझे कुटुंबीय मागील प्रकरणात कोणत्या मानसिकतेतून गेलो असेल याची कल्पना करावी आणि अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही, असे सांगत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी माझी स्वत:ची इच्छा आहे.
पोलीस अधीक्षकांनाही त्याबाबत सांगितले असल्याचे ते म्हणाले. खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे आव्हानही त्यांनी दिले.महिलांना पुढे करून सदर प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर करण्यात येत आहे, असा आरोपही संजय राठोड यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी केली राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज धोरणाची घोषणा
- ‘चिक्की घोटाळ्यात अजून गुन्हा का दाखल केला नाही?’, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
- ‘पुरुषोत्तम खेडेकरांनी मनाला वाटेल ते लिहिल्यामुळे मराठ्यांची डोकी भडकली!’
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

