🕒 1 min read
अमरावती : मागच्या महिन्यात हायकोर्टाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन त्यांना दणका दिला होता. तर विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. हाच धागा पकडत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला होता. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी-बबली निघाले”, अशा शब्दात चाकणकर यांनी नवनीत आणि रवी राणांवर तोफ डागली होती.
त्याला आता नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ज्यांना मी ओळखतच नाही त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, अशा टोला खासदार नवनीत राणा यांनी रुपाली चाकणकरांना लगावला होता.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस खूप वादळी ठरले. अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी सुद्धा भाजपच्या आमदारांनी तुफान राडा घातला. विधानभवनाच्या बाहेर भाजपकडून आंदोलन केले. तर दुसरीकडे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड पळवून नेल्याचा प्रकार घडला. भाजपचे आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सभागृहात काळा बोर्ड घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर राजदंड घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंकेच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला समोर ; ‘एवढे’ दिवस रहावे लागणार विलगिकरणात
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
- महाराष्ट्रातील दोन दिग्गज मंत्र्यांना का द्यावा लागला राजीनामा ?
- वंचित बहुजन आघाडीपासून प्रकाश आंबेडकर काही काळ दूर; तर प्रभारी अध्यक्ष…
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
