🕒 1 min read
पुणे – पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाय योजनांबाबत काल पुण्यात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत, कोविड 19 च्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून, उपाय योजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना, योग्य नियोजन करून प्राधान्याने लशीची दुसरी मात्र देण्याची सूचना त्यांनी दिली. तसंच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार वैद्यकीय मनुष्यबळ वाढवण्याचे, तसंच औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी लसीकरण कक्षा स्थापन करण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी यावेळी दिले. या बैठकीला विधापरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, महापौर माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तिसऱ्या लाटेसाठी नियोजन करताना कोरोनामुक्त झालेल्या गावांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यात यावा असं गोऱ्हे यांनी यावेळी सुचवलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दौऱ्याची अपेक्षा करण्यात चुक नाही; मदत उशिरा नको, वेळेवर द्या’
- गणपतराव आबांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, समर्थकांना अश्रू अनावर
- नेम चुकला : पत्नी दिपीकानंतर पती अतनु दास ऑलिम्पिकमधून बाहेर
- असा राजकारणी पुन्हा होणे नाही, यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले दुःख
- महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला – जयंत पाटील

