अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता येथील आयटीआय परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशिक्षण केंद्र व तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत १00 खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रूग्णालयासाठी स्वतंत्र रस्त्याचीही निर्मिती होत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणाऱ्या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील ‘डीआरडीए’च्या प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी राजपूत, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- नागवडे नेमके कोणत्या पक्षाचे?; हर्षवर्धन पाटील, विखेंना टाळत नागवडे यांचा थोरातांच्या हस्ते कार्यक्र
- खासदार सुनील मेंढे यांनी संसदेत मांडला भंडाऱ्याच्या पूरस्थितीचा लेखाजोखा
- संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर देखील कोल्हापुरात मराठा आंदोलकांना नोटिस!
- सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांकडे गोंदियावासियांचे लक्ष
- खासदार सुनील मेंढे यांनी संसदेत मांडला भंडाऱ्याच्या पूरस्थितीचा लेखाजोखा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

