Share

बेळगाव महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ; अवघ्या 10 जागांवर मानावं लागलं समाधान

Published On: 

बेळगाव : कर्नाटकसह सर्व राज्यांचे लक्ष लागून असणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपने निविर्वाद आपला झेंडा फडकवला आहे. भाजपने एकहाती सत्ता काबीज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने ३६, काँग्रेसनं १०, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि एम आय एम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत.

या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा चांगलाच सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तब्बल ८ वर्षांनंतर झालेल्या या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष पहिल्यांदाच चिन्हावर आले आहेत. या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालात कमालीची उत्सुकता होती. काँग्रेसच्या खात्यात अवघ्या १० जागा आल्या असून काँग्रेसला इतक्यातच समाधान मानावं लागलं आहे.

भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती भगवा फडवणार अशी संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. मात्र त्यांचा चांगलाच अपेक्षा भंग झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!