मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर या पदासाठी कोण विराजमान होणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशातच आता नवीन माहिती समोर आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव या पदासाठी आघाडीवर होतं. मात्र त्यांनी देखील हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. यानंतर मुकुल वासनिक यांचं देखील नाव आघाडीवर आहे.
राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्तावः
गेहलोत आणि वासनिक यांची नावे चर्चेत असतानाच राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करावी, असा प्रस्ताव गेहलोत यांनी मंजूर केला आहे. राजस्थान काँग्रेसने राहुल गांधी यांना अध्यक्ष करा असा प्रस्ताव मांडला आहे. तर प्रक्षश्रेष्ठींनी हा प्रस्ताव पाठवला असल्याचा समोर आलं आहे.
गेहलोत यांनी बैठकीत मांडला प्रस्तावः
राजस्थान, हे असा प्रस्ताव करणारं पहिलं राज्य आहे. गेहलोत यांनी बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. अध्यक्ष पदासाठी गेहलोत यांचं नाव चर्चेत असताना राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत. अशोक गेहलोत यांना राजस्थान बाहेर जाण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राजस्थान काँग्रेसच्या नवनवीन सदस्यांची शनिवारी बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून प्रादेशिक निवडणूक अधिकारी राजेंद्र सिंग कुम्पावत यांनी या बैठकीत उपस्थिती लावली.
दरम्यान, अशोक गेहलोत यांनी नकार दिल्यानंतर आता मुकुल वासनिक यांना काँग्रेसचे अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी पुढे केलं जाऊ शकत. वासनिक यांनी याबाबत सोनिया गांधी यांना 2019 मध्ये पत्र लिहिलं होतं. राहुल गांधींच्या राजीनामा नंतर मुकुल वासनिक अनेक नेत्यांचे आवडते नेते होते. त्यामुळे ते अध्यक्ष झाले असते. मात्र, काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Vivo New Launch | Vivo T1 5G चे नवीन Silky White वेरिएंट लॉन्च, जाणून घ्या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत..
- Gautam Gambhir । विराट कोहली सलामी फलंदाज म्हणून खेळेल का? या प्रश्नावर गौतम गंभीर संतापला, म्हणाला…
- Uday Samant | “…यातून आदित्य ठाकरेंच्या कर्तुत्वाचा आपमान दिसला”, उदय सामंताचा घणाघात
- ब्रह्मास्त्र रिलीज होताच मौनी रॉय झाली आणखीनच बोल्ड..!
- Jayakumar Gore । राष्ट्रवादीत बारामती, फलटणकरांची घराणेशाही एकदम ओक्केच; जयकुमार गोरेंचा टोला


