🕒 1 min read
मुंबई : युवासेनेचे प्रमुख शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे कालपासून शिवसंवाद यात्रेनिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी सभा घेतल्या यानंतर ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांच्यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली. तसेच त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर देखील टीका केली. यावर उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर उदय सामंत यांची टीकाः
आम्ही आदित्य ठाकरेंसोबत असताना त्यांच्या सभांना पन्नास हजार शिवसैनिकांची गर्दी असायची, मात्र, काल झालेल्या रत्नागिरीतील सभेत चारशे खुर्च्या होत्या, असं उदय सामंत म्हणाले. तसेच त्यांना कॉर्नर सभा घ्याव्या लागत आहेत, हा आदित्य ठाकरेंच्या कर्तृत्वाचा अपमान आहे, मात्र, इतरांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेऊन आपण उत्तर देणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलं आहे.
या सभेत कोण किती निष्ठावान आहे, कोणी काय काय केलं होतं, हे उघडपणे सांगणार असल्याचा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत शनिवारी रत्नागिरी शहराच्या दौर्यावर आले असता वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प जाण्याला पूर्वीचे उद्योगमंत्रीच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं तसेच त्यांनी हाय पॉवर कमिटीची सभा का घेतली नाही? त्यांच्या मिटिंग झाल्या होत्या, तर त्यामध्ये काय चर्चा झाली? हे का सांगत नाहीत, मागच्या उद्योगमंत्र्यांनीच याचं उत्तर देणं आवश्यक होतं, असा घणाघात सामंतांनी केला. मागील उद्योगमंत्र्यांच्या काळात काय काय ‘उद्योग’ झालेत यांची चौकशी लावणार असल्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ब्रह्मास्त्र रिलीज होताच मौनी रॉय झाली आणखीनच बोल्ड..!
- Jayakumar Gore । राष्ट्रवादीत बारामती, फलटणकरांची घराणेशाही एकदम ओक्केच; जयकुमार गोरेंचा टोला
- Jio Prepaid Recharge | एअरटेल चे टेन्शन वाढले! कारण जिओ देत आहे 155 रिचार्जमध्ये संपूर्ण महिना इंटरनेट..
- Raj Thackeray | 5 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर रेल्वेने निघालेले राज ठाकरे नागपुरात दाखल
- IND vs AUS | भारतीय संघाला मोठा झटका, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेतून हा वेगवान गोलंदाज बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
