टीम महाराष्ट्र देशा : पुढच्या एक महिन्यासाठी ते कोणत्याही कॉंग्रेस प्रवक्त्याला टीव्ही कार्यक्रमांसाठी पक्षाची बाजू मांडण्यासाठी पाठवणार नाहीत. कॉंग्रेसने सगळ्या वाहिन्यांच्या संपादकांना कॉंग्रेस प्रवक्त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करू नये अशी विनंती केली आहे. कॉंग्रेसच्या रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. या निर्णयामागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. यावर काँग्रेसचा हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
काँग्रेस प्रवक्त्यांबाबतची भूमिका योग्य आहे. दिल्ली आणि देशातील वारे एकादिशेने सुरु आहेत. अलीकडे मीडियात आपल्या विचारांचा नाही त्याला झोडपून काढले जाते. काही अपरिपक्व नेते आपल्या विधानांनी वाद निर्माण करतात. प्रत्येक विषयावर मत व्यक्त करणे गरजेचे नसते. काही वेळेला मौन योग्य आहे. अस संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर कॉंग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच्या कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत राहुल गांधी आणि इतर प्रदेशाध्यक्षांनी पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामे सादर केले आहेत परंतु ते अद्याप स्वीकारलेले नाहीत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

