Share

कॉंग्रेसनेही ‘सीएए’ समजून घ्यावा ; महाराष्ट्रातील कॉंग्रेस खासदाराचा पक्षाला घरचा आहेर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – नागरिकत्व कायदा सीएए, एनआरसी, एनपीआर हा विषय गुंतागुंतीचा आहे. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही तर काँग्रेसला सुद्धा ते स्वत: समजून घ्यावं लागेल. फक्त शिवसेनेला सांगून चालणार नसल्याचं वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेेचे खासदार कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे हे एनआरसी, सीएए, एनपीआर यावर आपली बदलेली भूमिका सांगत आहेत. काही काँग्रेस नेत्यांनी अगोदर एनआरसी, सीएए, एनपीआर आणि कलम ३७० निष्प्रभ करण्याला अगोदरच पाठिंबा जाहीर केला होता असंही केतकर यांनी सांगितलं आहे.

शिवसेना हा कायम भगव्या आघाडीत होता. त्यांना वेगळ्या पद्धतीने समजून सांगावं लागेल. किमान समान कार्यक्रमावर एकजूट असेल तर सरकार पडायचं कारण नसल्याचंही केतकरांनी म्हटलं आहे.

त्यामुळे कॉंग्रेसला यामुद्द्यावरून घराचा आहेर मिळाला आहे असंच म्हणव लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!