टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेसने ताठर भूमिका घेऊ नये, काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नको?, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या सोबत आघाडी करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत.
देशातील लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीच्या हालचालींचा जोर वाढलेला पाहवयास मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा हे मनेसेला आघाडीत सामील करून घेण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचा मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध आहे.
राज्यात लोकसभेला राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनेसेने लोकसभेची तयारी चालवाली आहे. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा, मुंबईतील फुटपाथावरील अनधिकृत दुकाने, फेरीवाले यांच्या मोहीम असो की, मुंबईतील राज ठाकरे यांच्या सभा असो, ही सगळी तयारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यावर ठेउनच केली गेली आहे. त्यामुळेच मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे इच्छुक आहेत.
त्यावर बोलताना अजित पवार म्हणले की, काँग्रेसने ताठर भूमिका घेऊ नये. काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नको?. दरम्यान,काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या घरी कृष्णकुंजवर त्यांची भेट घेतली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
