Share

कॉंगेस-राष्ट्रवादीच्या दिरंगाईमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत शेकऱ्यांची कर्जमाफी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि सुरु असलेल्या प्रकल्पांचा आढावा यासाऱ्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत 6 मंत्र्याचे खातेवाटप होण्याची शक्यता होती. मात्र हे खातेवाटप पुन्हा लांबणीवर पडले आहे.तर उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील मंत्री पुढील एक महिना तरी बिनखात्याचे मंत्री म्हणूनचं राहणार आहेत.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता होती. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे मंत्रिपदाबाबत ठरत नसल्याने खातेवाटपाला आणि मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई होत असल्याचं दिसत आहे. शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदे द्यायची, याची यादी तयार आहे. मात्र कॉंगेस-राष्ट्रवादीमध्ये अजूनही चर्चाचं होत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान हिवाळी अधिवेशन हे १६ ते २१ डिसेंबर या काळात होणार आहे. या अधिवेशनात ठाकरे सरकार काही महत्वपूर्ण निर्णय घेणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी उचलून धरला होता. त्यामुळे निवडणुकीच्या काळात राजकीय व्यासपीठावरून दिलेली आश्वासन ठाकरे सरकार पूर्ण करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1202424937325068289?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1202231708361220101?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1202228413592829952?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!