मुंबई : राज्य आणि देशाच्या राजकारणात एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. याकरिता आघाडीच्या आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या खरेदीसाठी विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आरोपीने घेतल्याने खळबळ उडाली आहे.
झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. यातील आरोपी अभिषेक दुबे याने बावनकुळे हे दि. १६ जुलैला सकाळी १० वाजता तिन्ही आमदारांना घेऊन बेलखेडे, बावनकुळे आणि चरणसिंह यांनी अनेक नेत्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली. तेथे आमदारांना एक कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याबाबत चर्चा झाली. पण आमदारांना रक्कम न मिळाल्याने ते सर्वजण नाराज होऊन त्याच दिवशी विमानाने रांचीला परतले असा जवाब पोलिसांना दिला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, ‘माझे नाव या प्रकरणात कसे आले हे माहिती नाही. मी १९ जुलैपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सध्या जालना येथे असून सोमवारी नागपुरात येत असल्याचे बावनकुळे म्हणाले. मात्र १५ -१६ जुलै रोजी आपण कुठे होता, असे विचारले असता त्यांनी फोन कट केला.
केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवेंसमवेत डॉ. भागवत कराड ह्यांना सदिच्छा भेट. वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही कामना तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल डॉ कराड ह्यांचे अभिनंदन.@DrBhagwatKarad pic.twitter.com/t40R5GtZA4
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 17, 2021
दरम्यान, या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे यांचे ट्विटर अकाऊंट पाहिले असता दि. १५ आणि १६ जुलै रोजी ते कोठे होते याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाहीये. परंतू दि. १७ जुलै रोजी बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांची दिल्लीत भेट घेतल्याचे समोर आले आहे. तेथून परतल्यानंतर दि.१९ जुलैपासून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या संघटनात्मक दौऱ्याला सुरुवात केली. त्यामुळे झारखंड आमदार खरेदी प्रकरणात बावनकुळे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे की नाही हे लवकरच समोर येणार आहे. झारखंड पोलिसांनी हा विषय अजेंड्यावर ठेवत चौकशी सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
- उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर, साताऱ्यात; पूर परिस्थितीचा आढावा घेणार
- मुख्यमंत्री ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्तांशी साधणार संवाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

