प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे लखीमपूर खेरी घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात समोसे वाटण्यात आले. मात्र एकाने जास्त समोसे घेतल्याने यावरुन दोन काँग्रेस नेत्यात हमरीतुमरी नंतर शिवीगाळ झाली. आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
६ ऑक्टोबर रोजी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याच्या सुचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर प्रयागराज येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तीथे काँग्रेसनेते इरशाद उल्ला यांनी या कार्यकर्त्यांना समोसे वाटले. मात्र इरशाद उल्ला यांना एका काँग्रेस नेत्यांच्या हातात तीन समोसे दिसले. त्यावर इरशाद यांनी या नेत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. ते व्हा या दोन नेत्यांत शब्दीक वाद झाले नंतर शिवीगाळ व हाणामारी झाली. उपस्थितांनी या घटनेचा व्हिडीओ शूट करत तो सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
या प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी कर्नलगंज पोलीस ठाण्यात स्वत:हून गुन्हा दाखल करुन घेतला आहे. तसेच काँग्रेसनेही या दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून जिल्हाध्यक्षांपुढे हजर होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मिडीयावर तुफान चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार

