🕒 1 min read
Gajanan Kirtikar | मुंबई : ठाकरे गटातील विश्वासू नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांनी घणाघात केला. अशातच गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) आक्रमक झालेला पाहिला मिळत आहे. यावेळी माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल फेरीचे आयोजन केले होते.
मतदारसंघात सलग साडेतीन वर्षे किर्तीकर गायब असून त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत काँग्रेस कार्यकर्ते होते. माजी खासदार संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल फेरीचे आयोजन केले होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी निरुपम यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले.
निरुपम यांच्या अटकेनंतर कार्यकर्ते प्रचंड संतापले. त्यामुळे पोलिस ठाण्याबाहेरच काँग्रेस कार्यकर्तांनी आंदोलन केलं. तसेच काही तासांनी निरुपम यांना सोडण्यात आलं आहे. किर्तीकर यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर निरुपम यांनी जोरदार टीका केली.
आंदोलन सुरू होण्याअगोदरच घरात येऊन ताब्यात घेणे हे बेकायदा असून पोलिस सरकारच्या दबावाखाली लोकशाहीचा आवाज दाबण्यात आलं असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार!, ईडीने बजावली नोटीस अन् दिला ‘हा’ आदेश
- Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंच्या अभिवादानंतर ठाकरे गटाकडून बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण
- Chandrakant Patil | “संजय राऊतांच्या गुरुंचा इतिहास खंजिराचाच…”; चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला
- Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; मंदा खडसेंची याचिका फेटाळली
- Sushma Andhare | “मोदी टेलिप्रॉम्प्टरवर अन् शिंदे फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
