🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसवर सातत्याने आक्रमक टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य प्रदेशातील प्रचार सभेत या पक्षावर धक्कादायक आरोप केला. ‘काँग्रेसवाले माझ्या हत्येचे स्वप्न पाहताहेत’, असा हल्लाबोल मोदी यांनी केला. इटारसी येथे बोलताना मोदी यांनी हा आरोप केला.
‘काँग्रेसजनांमध्ये इतका मोदीद्वेष आहे की त्यांना माझ्या हत्येचे स्वप्न पडत आहे. मात्र मध्य प्रदेशाबरोबरच देशातील जनता माझ्या पाठीशी आहे, याचा त्यांना विसर पडला आहे’, असे खळबळजनक वक्तव्य मोदी यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

