🕒 1 min read
मुंबई : मोदी सरकारन पेट्रोल-डिझेल संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे आता तुमच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटी आणि रोड सेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर तीन रुपये (३ ₹ ) प्रति लीटरपर्यंत वाढतील.
आता कॉंग्रेसने सरकारच्या या निर्णयावर टीका केलीआहे. केंद्र सरकार सामन्या जनतेच्या पैशावर डल्ला टाकून नफेखोरी करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने सरकारवर केला आहे.
पेट्रोल-डीजल पर एक्साइज ड्यूटी ₹3; रोड सेस ₹1 बढ़ाया है।
सरकार को इससे एक साल में ₹40,000 करोड़ का मुनाफा होगा।
पीएम आर्थिक सलाहकार परिषद के सदस्य नीलेश शाह का कहना है कि कच्चे तेल के मूल्य में कमी से सरकार को ₹3.4 लाख करोड़ का मुनाफा हुआ है: @ajaymaken
#TheGreatBJPLoot pic.twitter.com/ojQPB3Vx35— Congress (@INCIndia) March 14, 2020
आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत असताना जास्तीत जास्त फायदा पदरात पाडून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रतिलिटर पेट्रोलवर रस्ते उपकरात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असताना केंद्रातील भाजप सरकार उत्पादन शुल्क वाढवून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावत आहे.हा उघड उघड जनतेच्या कष्टाच्या पैशांवर डाका असून भाजप सरकारने ही शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसने केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असताना केंद्रातील भाजप सरकार उत्पादन शुल्क वाढवून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावत आहे.
हा उघड उघड जनतेच्या कष्टाच्या पैशांवर डाका असून भाजप सरकारने ही शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी!#TheGreatBJPLoot pic.twitter.com/09Ao6fP6iS
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 14, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
