टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पिकविमा कंपन्यान विरोधात आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढला होता. मात्र शिवसेनेच्या या मोर्च्याची विरोधकांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. सत्तेतून असून देखील मोर्चा काढवा लागत असल्याच्या टीका शिवसेनेवर होत आहेत. तर आता शिवसेनेला दुतोंड्या वाघाची उपमा देत कॉंग्रेसने हिणवले आहे.
दुतोंड्या साप अनेकांनी पाहिला असेल, मात्र दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेमुळे लाभलं आहे. शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवरुन काँग्रेसने सेनेवर निशाणा साधला आहे. कधी हा वाघ सत्तेत असतो तर कधी विरोधात, कधी स्वबळाची भाषा करतो तर कधी युतीची, कधी स्वाभिमानी असतो तर कधी लाचार. त्यामुळे झाले ‘बहु होतील बहु, परंतु या दुतोंड्या सम हाच!’ असे काँग्रेसने म्हटले आहे. जर खासगी विमा कंपन्याचे खिसेच भरायचे तर हा मोर्चाचा दिखावा कशासाठी असेही काँग्रेसने म्हटले आहे.
दरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शिवसेनेच्या पीकविमा मोर्च्यावर टीका केली होती.अधिवेशनाच्या काळात दुष्काळाच्या चर्चेच्या दरम्यान पीक विम्याच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींची भाषणे बघितली तर ती आमची मागणी होती. मात्र आता शिवसेना उगाच स्टंटबाजीची करत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

