🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरवर फोटो शेअर करत भारतीय जवानांची खिल्ली उडवली असल्याचे दिसत आहे. योगदिनानिमित्त श्वान व सैन्याचे जवान योग करत होते, श्वान व जवानांचा योगा करतानाचा फोटो शेअर करत न्यू इंडिया असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जात आहे. यानिमित्त भारतीय जवानांनी आणि श्वानांनी योगदिन साजरा केला, दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सैन्यातील जवान आणि श्वानपथकातील श्वानांचे योग करतानाचे फोटो शेअर करत न्यू इंडिया’ असे लिहिले.
राहुल गांधींनी केलेल्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले आहे. इतकेच नव्हे तर, राहुल गांधींनी सैन्यातील जवानांचा अवमान केल्याचेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
New India. pic.twitter.com/10yDJJVAHD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
