🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- मृग व आद्रा नक्षत्र कोरडेठाक गेल्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हुलकावणीने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. दुबार पेरणी करण्यासाठीची नेमकी तारीखही कृषी विभागाकडून कळविली जात नाही. किती दिवस दुबार पेरणी केली तर चालेल, याची शाश्वती नसल्याने अनेकांनी आपले शेत आता खरिपाऐवजी रबी हंगामासाठी तयार करून ठेवले आहे.
राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी असल्याचे चित्र आहे. जुलै महिना संपत आला तरी राज्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. एका बाजूला बळीराजासमोर दुबार पेरणीचे संकट आहे तर दुसऱ्या बाजूला खरिपाच्या ५० टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. आताच दुष्काळासारखी परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पिककर्ज २५ टक्केच शेतकऱ्यांना मिळालेले आहे. लाखो शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत. बँका नडवत आहेत. यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

