टीम महाराष्ट्र देशा : महाविकास सरकारच्या पहिल्याच हिवाळी अभिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना दिलासा देणार निर्णय घेतला. मात्र शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच सरकारने घेतलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला शुक्रवारी मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली.
याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले, ‘आम्ही योग्य पद्धतीनेच कर्जमाफी केली आहे. विरोध करणे हे विरोधकांचे कामचं आहे, असे थोरात यावेळी म्हणाले.
तसेच भाजपने जेव्हा मदत करण्याची वेळ होती तेव्हा ती केलेली नाही म्हणून आता विरोधक टीका करत आहेत, असा टोला देखील थोरातांनी लगावला. याचप्रमाणे २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्या शेतकर्यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘निकषांच्या मुद्द्यावरून आमच्या कर्जमाफीवर आक्षेप घेतला गेला, पण या कर्जमाफीलाही निकष आहेत. २ लाख कर्ज थकलेला शेतकरी उरलाच नाही, मग कोणाची कर्जमाफी करणार? असा सवाल पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

