Share

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५० पेक्षा अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात’

Published On: 

मुंबई – मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश घेताना पाहायला मिळत आहे यावरून पवारांनी भाजपावर टीका करत नेत्यांवर चौकशीचे दबाव आणून पक्ष बदल करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप केला. त्यावर गिरीश महाजनांनी शरद पवारांना इशारा देत काँग्रेस-राष्ट्रवादीत ५० पेक्षा अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा महाजनांनी केला आहे.

पवारांच्या आरोपावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, घराणेशाहीला लोक कंटाळली आहे. पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपण कुठे चुकतं हे बघावं. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीवर आली आहे. येत्या आठवडाभरात अनेक पक्षप्रवेश होतील असा दावा गिरीश महाजनांनी केला आहे.

दरम्यान,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे.भाजपाकडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेकांची नावं पसरविली जात आहेत. लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम भाजपानं केलंय दुसरा पक्ष फोडून आपला पक्ष वाढविणे ही संस्कृती नव्यानं भाजपाने आणली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. भाजपाचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते फक्त योग्य वेळ आणि संधीची वाटत पाहत आहेत असा दावा देखील त्यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!