मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वादावर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मत आपले मांडलं आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.
“राहुल गांधी यांनी आपलं मत मांडलं आणि शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवारांनी राहुल गांधींबद्दल काय विधान केलं, त्याला इतकं महत्त्व नाही”, असं ते म्हणाले.
“शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. कोणी कितीही म्हटलं, तरी हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे”, असा विश्वास अस्लम शेख यांनी व्यक्त केला.
‘उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत, म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय’
दरम्यान, भारत चीन प्रश्नावर ही राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे सध्या गोळीबार न होता केवळ झटापटी होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला. त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही’, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये जोरदार द्वंद्व रंगलेले पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. चीनच्या प्रश्नावर राजकारण करू नये, हे खरे आहे. पण, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारणारच. आम्ही काही घरगुती कामासाठी प्रश्न विचारत नसून जनतेसाठी आणि जनतेचा आवाज म्हणून प्रश्न विचारत आहोत’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले. तसंच, ‘सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे म्हणजे, विरोध करणे असं होत नाही. त्यांचे जे विचार काही असतील ते मान्य आहे. पण, आमचे विचार हे स्पष्ट आहे’ असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
‘चीनच्या डोळय़ांत डोळे घालून बघणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

