Share

‘मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनोंमे जान होती है’ शिक्षणमंत्र्यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Published On: 

मुंबई: कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद होती. म्हणजेच जवळपास ५७८ दिवसांनी आज बुधवारी सर्व महाविद्यालये उघडली आहेत. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याबद्दल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आज पासून राज्यातील कॉलेज सुरू होत आहेत.सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा."मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनोंमे जान होती है, युही पंख होनेसे कुछ भी नही होता ‘होसलो से उडान होती है ‘ असे आशादायी ट्वीट करत उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील सर्व वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मॉडेल डिग्री कॉलेज तसेच स्वायत्त महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. दरम्यान महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी संपूर्ण महाविद्यालय सॅनिटाइज करण्यात आले आहेत. यामध्ये एका वर्गात विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्यवस्था असणार आहे.

तर १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा असणार आहे. तर दोन लशी घेतलेल्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच एका बाकावर केवळ एकाच विद्यार्थ्याला बसविणार येणार आहे. प्रत्येकाला मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!