औरंंगाबाद : मारहाणीच्या गुन्ह््यातील आरोपीला अटक का केली नाही, असे म्हणत वाद घालून तक्रारदाराने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही घटना १७ मार्च रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास मिसारवाडी भागात घडली. सुनील जनार्दन फलके (वय ३४, रा. मिसारवाडी, गल्ली क्र. ५) याने मारहाण झाल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक का केली नाही. यावरुन फलके याने ठाणे अंमलदाराशी वाद घालून स्वत:च्या मानेवर ब्लेडने वार केला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्या बद्दल फलकेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली


