औरंंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणात नाका बंदी सुरु आहे. त्या कारवाई मधून मोठ्या प्रमाणात दंड वसुली सुरु आहे. मात्र, वाहनचोरीकडे पोलिसांचे लक्ष नसल्याने. नागरिक पोलीस आयुक्तांकडे वाहनचोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहे. वाहन चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी वाहने लंपास केली आहेत.
स्वप्नील नंदकुमार पाठक (वय ३३, रा.दीप अपार्टमेंन्ट, उस्मानपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीजे-८८५९) चोरट्याने ८ मे रोजी रात्रीच्या सुमारास अपार्टमेंन्टच्या पार्कींगमधुन चोरून नेली. सय्यद जुबेर सय्यद साबेर (वय २८, रा.दानिश पार्क, नारेगांव) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईपी-७१४७) चोरट्याने ९ मे रोजी जामा मशिदीजवळून चोरून नेली.
रामेश्वर लक्ष्मण सोमासे (वय २९, रा.शितलनगर, विटावा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीयू-८३११) चोरट्याने १५ मार्च रोजी घराजवळून चोरून नेली. शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे उस्मानपुरा, सिटीचौक आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

