Share

दिलासादायक ! कोरोना विरोधात ‘ही’ लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा

Published On: 

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस दिली जात आहे. सीरमनं तयार केलेली आणखी एक लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. अमेरिकेलीत नोवोवॅक्स कंपनीच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेल्या SII novavax या लसीच्या चाचणीचे परिणाम खूपच सकारात्मक आले आहे. प्रत्येक देश आता कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देत आहे.

अशातच लस निर्मिती करणाऱ्या नोवाव्हॅक्स कंपनीने आणलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट विरोधात देखील ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात यावर कंपनीने अभ्यास केल्यानंतर माहिती जाहीर केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसोबत नोवाव्हॅक्स या अमेरिका स्थित कंपनीने करार केला आहे. याअंतर्गत नोवाव्हॅक्सचे २०० डोस सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार केले जाणार आहेत.

दरम्यान, या लसींचा साठा आणि वाहतूक सोपी आहे. तर, भारत या वर्षाच्या अखेरपर्यंत या लसीचे 20 कोटी डोस आणण्याच्या तयारीत आहे. जगभरात ही लस खूप फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत यूएस, युरोप आणि जगभरातील इतर देशांकडून कंपनी आपल्या लसीसाठी परवानगी मागणार आहे. त्यानंतर दर महिन्याला या लसीचे 100 दशलक्ष डोस तयार केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!