Share

दिलासादायक: आता ग्राहकांची वीज कापली जाणार नाही!

Published On: 

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे वीज वितरण कंपनीने बंद केले होते. त्यामुळे सरासरीच्या 10% बिल ग्राहकांना ऑनलाइन पाठवण्यात येत होते. जून महिन्यात रिडिंग घेऊन ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. मात्र, हे बिल बघून ग्राहक चक्रावले आहेत. महिन्याला साधारणतः 500 ते 700 रुपये बिल येणाऱ्या लोकांना 3 महिन्याचे साडेतीन हजार ते चार हजार रुपये आले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना खाण्याचा प्रश्नाला समोरे जावे लगतेय. यातच हजारो रुपये कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना पडलाय.

मात्र, आता एक दिलासादायक वृत्त आहे. अनिल परब यांनी आज (14 जुलै) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये वाढीव वीज बिलाच्या तक्रारींबाबत चर्चा झाली. त्यांच्या चर्चेनंतर अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कुठल्याही ग्राहकाची वीज कापली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं. ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात दिलासा मिळेल. ज्यांना वीजबिल जास्त आलं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाई, असं अनिल परब म्हणाले.

‘पार्थ पवार यांचा मास्टरस्ट्रोक’, महापालिका प्राथमिक शिक्षकांचा ‘हा’प्रश्न सुटला

“वाढीव वीज बिलाच्या तक्रारीचं निवारण करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. अधिकाऱ्यांनी तक्रारींचे निवारण केलं पाहिजे, अशी मागणी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे”, असंदेखील ते म्हणाले. हे वृत्त टीव्ही 9 या वहिनीनुसार मिळत आहे.

मुंबईसह कोकणात मुसळधार, हवामान खात्याचा ‘या’ भागांना रेड व ऑरेंज अलर्ट

लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरी आहे. अनेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे दिवसाचे नऊ-दहा तास कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असतात. त्यातच उन्हाळ्यात पंखे आणि एसी यांचाही वापर दिवसभर होत असल्याने वीज बिल वाढले आहे.दरम्यान, जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!