Share

मुंबईसह कोकणात मुसळधार, हवामान खात्याचा ‘या’ भागांना रेड व ऑरेंज अलर्ट

Published On: 

मुंबई: गेल्या काही दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. तर आज मात्र मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याने काल पासून पुढचे चार दिवस पावसाचे असल्याचे अंदाज वर्तवले होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजानुसार, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

धारावी परिस्थिती हाताळण्यामागे राहुल गांधींचे मार्गदर्शन; मंत्री वर्षा गायकवाडांची श्रेयवादात उडी

तर कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात सकाळपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत 391 मिमी पाऊस झाला. तर मालवण तालुक्यात सर्वाधिक 112 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

‘राहुल-प्रियंका यांच्यासमोर दुसरं प्रतिभावान नेतृत्व उभं राहू नये म्हणून पायलट यांना हटवलं’

दरम्यान, हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. तर उद्या (दि. १५ जुलै) याच भागात अतिमुसळधार आणि परवा (दि. १६ जुलै) रोजी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी सोशल मिडिया बायोमध्ये केले ‘हे’ बदल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!